चंद्रपूर बल्लारपूर महामार्ग वरील अब्दुल कलाम रोडचा अपूर्ण रस्ता

चंद्रपूर बल्लारपूर महामार्ग काम रखडले: टोल प्रशासनाला मनसेचा आंदोलनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर बल्लारपूर महामार्ग वरील अब्दुल कलाम रोडचे काम गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून रखडले आहे. केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी टोल प्रशासनाकडे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (अस्वलाच्या मृत्यूमुळे उघड झालं भयावह कांड, वाचा सविस्तर)

चंद्रपूर ते बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील अब्दुल कलाम रोडचे रखडलेले काम आणि त्यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी व अपघाताच्या धोक्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम रखडले असतानाही टोल वसुली नियमित सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत थेट ‘मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चंद्रपूर बल्लारपूर महामार्ग काम किती महिने रखडले?

या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असून, सध्या काम बंद असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. परिणामी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे प्रवाशांकडून टोल आकारला जात असताना दुसरीकडे मात्र सुरक्षित व दर्जेदार रस्त्याची सुविधा का दिली जात नाही, असा थेट सवाल मनसेचे जिल्हा सचिव किशोर डी. मडगुलवार यांनी उपस्थित केला आहे.

टोल प्रशासनाने तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदाराकडे पाठपुरावा करून रखडलेले काम मार्गी लावावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत दिवसा लाल झेंडे दाखवून आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स व वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरूच ठेवल्यास मनसे आपल्या खास शैलीत तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा मडगुलवार यांनी दिला आहे.

या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ कुकडे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीपभाऊ चंदनखेडे, तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ नागरकर, रुग्ण मित्र कृष्णा गुप्ता, जनहित कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ तुरक्याल, राज वर्मा, भारत जोगी, शुभम वांढरे, राजू देवांगन, फिरोज पठान, आशिष चरपेल्लीवार, मनोज रावले, राकेश मुनावत आणि मृणाल दुर्गे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment