नागभीड गोडाऊन आग लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमधून निघणारे धुराचे लोट

नागभीड बाजार समितीच्या धानाच्या गोडाऊनला भीषण आग; सुमारे तीन कोटींचे नुकसान

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

नागभीड, २४ नोव्हेंबर : नागभीड गोडाऊन आग २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन क्रमांक १ मध्ये लागली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडाऊनमध्ये ६ हजार २८० पोती धान आणि बारदान्याचे २१६ बंडल साठवले होते. नागभीड आणि ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांनी आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (अस्वलाच्या मृत्यूने उघड झालं भयानक कांड, वाचा सविस्तर)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन क्रमांक १ ला आज पहाटे भीषण आग लागून सुमारे तीन कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठवून ठेवलेले हजारो पोती धान, बारदाना तसेच गोडाऊनची इमारत जळून खाक झाली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागभीड गोडाऊन आग कधी आणि कशी लागली?

प्राप्त माहितीनुसार, आज मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बाजार समितीच्या गोडाऊन क्रमांक १ मधून धूर आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसून आले. ही बाब बाजार समितीच्या चौकीदाराच्या तात्काळ निदर्शनास आली आणि त्यांनी या घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. माहिती मिळताच नागभीड आणि ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांना तातडीने पाचारण करण्यात आले. दोन्ही दलांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.

मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोडाऊनमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली धानाची तब्बल ६ हजार २८० पोती आणि बारदान्याचे २१६ बंडल साठवून ठेवण्यात आले होते. आगीत हे सर्व धान, बारदाना आणि गोडाऊनच्या इमारतीचे मिळून अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गोडाऊनला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment