धान खरेदी केंद्रे चंद्रपूर: धान विक्रीसाठी आलेले शेतकरी

धानाचे पैसे ४८ तासांत? मुनगंटीवारांची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 26, 2026

चंद्रपूर – धान खरेदी केंद्रे चंद्रपूर जिल्ह्यात दिवाळीपूर्वी सुरू करावीत, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले. खरीप हंगाम २०२६-२७ साठी आधारभूत किंमत योजनेंतर्गत ही खरेदी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच धान विक्रीनंतर ४८ तासांत रक्कम बँक खात्यात जमा व्हावी, अशीही त्यांची मागणी आहे. (चंद्रपुरातील शेतकऱ्यांचे मुंबईत अन्नत्याग आंदोलन, वाचा बातमी)

धान खरेदी केंद्रे चंद्रपूर: दिवाळीपूर्वी मागणी का?

चंद्रपूरसह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आणि दिवाळीचा सण आनंदाने व विना-आर्थिक विवंचनेत साजरा करता यावा, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक व आग्रही भूमिका घेतली आहे. खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वीच सुरू करावीत, तसेच छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर धान विक्रीनंतर अवघ्या ४८ तासांच्या आत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रभावी व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील धान खरेदी व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी परिणय फुके समितीने छत्तीसगडच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन प्रशासकीय मान्यता व आर्थिक तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. धान विक्रीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत ठेवावे लागल्यास त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते, ज्याचा थेट परिणाम शेतीच्या पुढील हंगामावर, कर्जाचे हप्ते आणि कौटुंबिक गरजांवर होतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकरी नोंदणी, बारदाना, वजनकाटे व साठवणूक व्यवस्थेचे नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक निश्चित करावे, जेणेकरून अन्नदात्यांना कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय विलंबाला सामोरे जावे लागणार नाही, अशी ठाम भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मांडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment