Pratibha Dhanorkar NHAI Inspection on Bamni Rajura national highway service road

खासदार प्रतिभा धानोरकरांचा महामार्गावर धडक दौरा; NHAI अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 19, 2026

चंद्रपूर : Pratibha Dhanorkar NHAI Inspection चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बामणी ते राजुरा राष्ट्रीय महामार्गावरील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये असा इशारा त्यांनी दिला.

पुलाची उंची वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत असल्याचे पाहणीत आढळले. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग देण्याचे निर्देश खासदारांनी तातडीने दिले. (हे हि वाचा – वनविभागाच्या विश्रामगृहामागे चितळाचा मृतदेह)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर स्थानिक पातळीवर तत्काळ पावले

नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महामार्गांच्या विविध समस्यांवर आणि बाधितांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महामार्ग बाधितांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली, तसेच बामणी ते राजुरा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सर्व्हिस रोड आणि पुलाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली.

पुलाची उंची वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी प्रचंड अडथळा

या पाहणीदरम्यान, निर्माण होत असलेल्या पुलाची उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निदर्शनास आले. या समस्येची गंभीर दखल घेत त्यांनी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

बळीराजाला त्रास झाल्यास खपवून घेणार नाही; खासदारांचा स्पष्ट इशारा

“रस्ते आणि पुलांचा विकास हा जनतेच्या सुविधेसाठी आहे. परंतु या बांधकामामुळे जर बळीराजालाच त्रास होणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्राधिकरणाने त्वरित पर्याय शोधून शेतकऱ्यांची वाहतूक सुरळीत करावी,” अशी ठाम भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली.

या पाहणी दौऱ्याच्या व बैठकीच्या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट डायरेक्टर प्रविण कुमार बीजेवार, जी. आर. इन्फ्रा चे अधिकारी गिरीश खंडेलवार, ज्युनियर इंजिनिअर वाढी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष इंदूरवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, बल्लारपूर काँग्रेसचे पापा आर्या, माजी नगराध्यक्ष रमेशजी नळे, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, नगर परिषदेचे सर्व सभापती व नगरसेवक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व बाधित शेतकरी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment