Chandrapur Liquor Raid दरम्यान जप्त करण्यात आलेली गावठी दारू

Chandrapur Liquor Raid । पुणे विषारी दारू प्रकरण, चंद्रपूर पोलीस सतर्क, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 31, 2026

Chandrapur Liquor Raid : चंद्रपूर – राज्यात विषारी दारूमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजा असताना चंद्रपूर पोलिसांनी शहरात हातभट्टी मोहा दारू विरूद्ध ५ वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या असून सदर कारवाईत गावठी दारू २५१ लिटर तर मोहा फुल सडवा ४५० लिटर जप्त करण्यात आले. (तेलंगणा मधून थेट चंद्रपुरात प्रेयसीला ठार करण्यासाठी आला, आरोपी अटकेत)

Chandrapur Liquor Raid मध्ये काय जप्त झाले?

दारूबंदी कायद्याखाली विशेष मोहिमेअंतर्गत शहर पोलिसांनी ३१ मे रोजी शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर भागात झडती घेतली असता त्यामध्ये मोहा फुल दारूभट्टी, चार ठिकाणी मोहा फुल सडवा व हातभट्टी मोहा दारू अश्या वेगवेगळ्या ठिकाणी छापामार कारवाई करत ५ इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण ४० हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, भावना रामटेके, संजय धोटे, कपूरचंदं खरवार, दीपक गुरनुले, उमेश कोडापे, निलेश ढोक, सतीश गिरी व दीपिका झिंगरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment