Chimur Tiger Attack प्रकरणातील मोटेगाव जंगल परिसरातील घटनास्थळ

Chimur Tiger Attack । घरी बकऱ्या परतल्या गुराख्याला वाघाने उचलले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 31, 2026

Chimur Tiger Attack : चिमूर – नेरीवरून जवळ असलेल्या आणि तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मोटेगाव येथील कक्ष क्रमांक 38 मध्ये बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्याला पट्टेदार वाघाने हल्ला (Tiger Attack) करून ठार केले सदर घटना दि 31 मे ला सकाळी 10 वाजता दरम्यान घडली, मानव वन्यजीव संघर्षातील हि २० वी घटना आहे. (चार महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद)


मोटेगाव येथील गुराखी दिलीप जानबा ननावरे वय 45 वर्षे हे नेहमी प्रमाणे मोटेगाव ते पेंढरी मार्गावारील बद्री पहाडी च्या खाली कक्ष क्र 38 मध्ये सकाळीच बकऱ्या चारण्यासाठी गेले असता जंगलात दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत ननावरे यांना जागेवरच ठार केले त्यानंतर 500 मीटर दूर ओढत नेत जंगलात नेले.

Chimur Tiger Attack नंतर मोटेगावात भीतीचे वातावरण

सदर घटनेत वाघाने हल्ला केला तेव्हा 15 ते 20 च्या संख्येनी असणाऱ्या बकऱ्या ह्या सैरावैरा पाळल्या आणि घरी परत आल्या सदर बकऱ्या घरी परत आल्या मात्र वडील घरी आले नाही म्हणून मुलाने वडिलांना फोन केला पण उत्तर आले नाही , तेव्हा मुलगा काही लहान मुलांना घेऊन जंगल परिसरात गुराखी वडिलांना शोधायला गेला.

जंगलात त्यांना वडिलांचे फाटलेले कपडे आणि कुऱ्हाड आढळून आली तेव्हा सर्व मुले गावात पळत आले आणि गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली, गावातील तरुण मुले आणि गावकऱ्यांनी घटनास्थळा कडे धाव घेतली आणि संपूर्ण परिसर पिंजून काढले असता मृत्यूदेह जंगलात 500 मीटर दूर अंतरावर आढळुन आले तेव्हा ही घटना उघडीस आली.

सदर वाघ हा सकाळी 8 वाजता दरम्यान त्याच परिसरात असणाऱ्या रोपवाटिकेला पाणि टाकणाऱ्या महिला मजुरांना रस्ता ओलांडतांना दिसला तर काही रहदारी करणाऱ्या नागरिकांना सुद्धा तो जंगलात जाताना दिसला सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार ,ए सी एफ महेश गायकवाड वनरक्षक केशव पाटील वनरक्षक संभाजी वडझें वनरक्षक बाळकृष्ण नागरेआणि वनविभागाची संपुर्ण चमु घटनास्थळी दाखल झाली ,तसेच पोलिस निरीक्षक दिनेश लबडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

मृतक ननावरे यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे,अल्पप्रमानात कोरडवाहू जमीन असून त्यांच्या मागे एक मुलगा ,मुलगी आणि पत्नी आहे या घटनेमुळे मोटेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment