Chandrapur Tiger Death । चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवसात दोन वाघांचा मृत्यू

Chandrapur Tiger Death : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूच्या दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या असून यामध्ये दोन वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी वनविभागात घडली असून येथे एका विहिरीत पडल्याने प्रौढ वाघाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये एका चार महिन्यांच्या नर शावकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. (रेल्वेच्या धडकेत वाघीण ठार)

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटमध्ये चारगाव बगडे, हजारीचक रिट येथे शेतकरी पांडुरंग गोविंदा गजभिये यांच्या शेतशिवार सर्व्हे क्रमांक ५१ मधील शेतामध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शेतकरी आज सकाळी आपल्या शेतावर गेला असता, दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले, तेव्हा त्यांना एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. सदर विहीर २५ ते ३० फूट खोल असून तिला संरक्षक कठडे नव्हते.

Chandrapur Tiger Death प्रकरणामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विहिरीत पडलेला मृत वाघ हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ७ ते ८ वर्षे आहे. हा वाघ साधारणपणे ९ ते १० दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्याने या घटनेची माहिती तातडीने सिंदेवाही वनविभागाला दिली. वनरक्षक सचिन चौधरी यांनी तत्परतेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, क्षेत्र सहाय्यक फुलझाले, क्षेत्र सहाय्यक सौ. ममता गायकवाड, तसेच वनरक्षक ऋषी जावडे आणि राहुल धनविजय यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे., एन.टी.सी.ए. (NTCA) प्रतिनिधी बंडू धोतरे आणि एन.जी.ओ. (NGO) प्रतिनिधी तसेच ‘स्वाब’ संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा (मोक्का पंचनामा) करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत, वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवार संध्याकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पलासगाव रेंजमध्ये चार महिन्यांचा एक नर बाघ शावक मृत अवस्थेत आढळून आला. हा शावक त्या वाघिणीच्या तीन पिल्लांपैकी एक होता, ज्यांची या भागात नियमितपणे देखरेख केली जाते. शावकाच्या मृतदेहाबाबत माहिती मिळताच वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आवश्यक ती कारवाई पूर्ण केली.

वन्यजीव पशुवैद्यक डॉ. रविकांत खोबरागडे आणि डॉ. कुंदन पोडचलवार यांनी शावकाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) केले. सुरुवातीच्या तपासणीत असे समोर आले आहे की, शावकाचा मृत्यू तीव्र उष्णतेमुळे (लू लागल्याने) झालेल्या गंभीर न्यूरोलॉजिकल शॉकमुळे (तंत्रिका तंत्रावर पडलेला मोठा आघात) झाला आहे.

‘TATR’ (बफर) चे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी या निष्कर्षांना दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, शावकाच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा कोणत्याही प्रकारच्या घातपाताचे निशाण आढळलेले नाहीत. त्यांनी पुढे माहिती दिली की, वाघिणीची उर्वरित दोन्ही पिल्ले पूर्णपणे निरोगी असून ती सध्या आपल्या आईसोबत जंगलात सुरक्षितपणे फिरत आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांच्या नियमित देखरेखीअंतर्गत वन अधिकारी त्या वाघिणीवर आणि तिच्या उर्वरित पिल्लांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment