chandrapur vaghinicha mrutyu झाल्यानंतर घटनास्थळी वनविभाग अधिकारी

chandrapur vaghinicha mrutyu । चंद्रपूर वाघिणीचा मृत्यू; रेल्वेच्या धडकेत २ वर्षीय वाघीण ठार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 28, 2026

chandrapur vaghinicha mrutyu : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली ते सिंदेवाही मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली असा अंदाज आहे, जिल्ह्यात आतापर्यंत विविध कारणांमुळे जवळपास १० वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, बाप लेकाचा मृत्यू)

chandrapur vaghinicha mrutyu नेमका कसा झाला?

२८ मे रोजी पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास राजोली ते सिंदेवाही या रेल्वेमार्गावर रेल्वे पिल्लर क्रमांक ११८१/८ ते ११८१/९ दरम्यान रेल्वे इंजिन क्रमांक L/E ४१८२० च्या धडकेत मादी वाघाचा मृत्यू झाला. मृत वाघिणीचे वय अंदाजे २ ते ३ वर्षे असून सदर वाघिणीचे अवयव पूर्णतः शाबूत होते.

याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त होताच मुख्य वनसंरक्षक मणिकंद रामानुजन, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्य्क वनसंरक्षक गायकवाड, NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे व Swab Nature Care चे यश कायरकर यांच्या उपस्थितीमध्ये मृत वाघिणीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.

पंचनामा व शव विच्छेदन झाल्यावर वाघिणीच्या मृतदेहावर मध्यवर्ती काष्ठ भांडार सिंदेवाही मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंदेवाही वनक्षेत्रात सध्या मानव – वन्यजीव संघर्षाचा धुमाकूळ सुरु आहे. नुकताच वाघीण व बछड्यानी ४ महिलांवर हल्ला करीत त्यांना ठार केले होते. आतापर्यंत वाघिणींसह २ बछड्याना जेरबंद करण्यात आले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment