चंद्रपूर sugandhit tambakhu जप्त कारवाईतील मुद्देमाल

sugandhit tambakhu । बाबुपेठमध्ये पोलिसांची धडक; २.५६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 28, 2026

sugandhit tambakhu : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई मोहीम सुरु आहे, त्यामध्ये अंमली पदार्थ, सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलीस दल करीत आहे. कारवाईच्या या मालिकेत चंद्रपूर शहर पोलिसांनी २ लाख ५६ हजारांचा सुगंधीत तंबाखू बाबुपेठ भागातून जप्त केला. (गुन्हे शाखेची वाळू माफियांवर कारवाई, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त)

चंद्रपूर sugandhit tambakhu जप्त, कारवाई कशी झाली?

२७ मे रोजी बाबुपेठ भागातील महादेव मंदिर जवळील २९ वर्षीय श्रीमती शीतल लक्ष्मीकांत साटोणे यांच्या घरी पोलिसांनी धडक दिली असता त्याठिकाणी हुक्का शिशा तंबाखू मजा ८० नग खोके व खर्ड्याच्या खोक्यात १० लहान खोके जप्त करण्यात आलेल्या खोक्यात ९०० टिनाचे डबे असा एकूण २ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

सदर सुगंधित तंबाखू विक्रीकरिता घरी साठवणूक करण्यात आला होता, शहर पोलिसांनी या प्रकरणी २९ वर्षीय शीतल लक्ष्मीकांत साटोणे व ४२ वर्षीय लक्ष्मीकांत सुरेश साटोणे यांच्याविरुद्ध अन्न व सुरक्षा आणि मानके कायदा २००६ कलम २६(१), २६ (२), (i), २६ (२)(iv), २७ (३)(e) सहवाचन कलम ३० (२) (a) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment