चंद्रपूरातील बाबुपेठ येथे Tobacco Mafia Raid दरम्यान गुन्हे शाखेने जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा

Tobacco Mafia Raid | किराणा दुकानाच्या आडून सुरू होता तंबाखूचा अवैध व्यवसाय

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 20, 2026

Tobacco Mafia Raid : चंद्रपूर – पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या छापामार कारवाई सुरु आहे, स्थानिक गुन्हे शाखेने तंबाखू माफियांवर फास आवळणे सुरु केले आहे, भद्रावती, गडचांदूर नंतर चंद्रपुरातील बाबुपेठ मधील हनुमानच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहे. कन्फेशनरी च्या आड बाबुपेठमध्ये हनुमान आंबट्कर यांनी तंबाखूचा धंदा सुरु केला होता. गुन्हे शाखेने या कारवाईत आंबटकर बंधूंवर गुन्हा दाखल करीत ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (गडचांदूरात सुगंधित तंबाखू जप्त)

वर्ष २०१२ मध्ये शासनाने सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध लावल्यावर माफिया सक्रिय झाला, कन्फेशनरी च्या आड अनेकांनी तंबाखूची तस्करी सुरु केली, चंद्रपूर जिल्ह्यात वसीम झिमरी व जयसुख ठक्कर आणि गुप्ता हे मोठे Tobacco Mafia Raid व्यापारी आहेत. अनेक तालुक्यात व इतर जिल्ह्यात हे आपला अवैध व्यापार करतात.

बाबुपेठमध्ये किराणा दुकानाच्या आडून सुरू होता Tobacco Mafia Raid

चंद्रपुरातील बाबुपेठ मध्ये ३८ वर्षीय हनुमान श्रीकृष्णा आंबट्कर व ३५ वर्षीय संजय श्रीकृष्णा आंबट्कर राहणार दोघेही मराठा चौक, दोघांनी मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखूचा व्यवसाय थाटला आहे, यापूर्वी दोघांवर कारवाई सुद्धा झाली, त्यानंतर होलसेल किराणा दुकान थाटले, त्या दुकानाआडून आता हा सुगंधित तंबाखूचा व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे, बाबुपेठ मधील पान टपरीवर त्यांच्याकडून सुगंधित तंबाखूची खेप पोहचविल्या जाते हे विशेष.

१९ मे रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किराणा दुकानावर छापा टाकला, या छाप्यात हुक्का पार्लर साठी लागणाऱ्या ईगल आणि हुक्का कंपनीचे घातक सुगंधित हुक्का शिशा तंबाखूचे तब्बल २०५ पॉकिटस जप्त करण्यात आले. 

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हनुमान श्रीकृष्णा आंबटकर व संजय श्रीकृष्णा आंबटकर या दोघा भावावर चंद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, या प्रकरणी एकूण ५७ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात यापुढे अवैध धंदे व्यावसायिकांवर पोलीस कारवाईचा दांड्याचा प्रहार सुरूच राहणार आहे. Tobacco Mafia Raid

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.    

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment