Voter List Negligence : चंद्रपूर – मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Voter List Negligence चंद्रपूरातील शिक्षक निलंबन प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमान पंत यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 चे कलम 13 (AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींनुसार अधिकारांचा वापर करून श्री. दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. (इंधन दरवाढीविरोधात महिला कांग्रेसचे आंदोलन)
निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. Voter List Negligence
तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 च्या नियम 16 नुसार निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून निर्वाह भत्त्यावरील हक्कही बाधित होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
