चंद्रपूर : Chandrapur Voter List Suspension प्रकरणात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मतदार यादी तयारी आणि पुनरावलोकनाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन शिक्षकांसह तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांवर निवडणूक कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. (हे हि वाचा – महिलांच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलीस दलात पिंक व्हॅन दाखल)
मुरलीधर बागला हायस्कूल, चंद्रपूर येथील सहायक शिक्षक आर.बी. येसांबरे, चंद्रपूर मनपा शाळेतील सहायक शिक्षक आनंद गेडाम यांच्यासह चंद्रपूर वेकोली क्षेत्रीय मुख्यालयातील सोनू ढुमणे, किरण रामटेके आणि मनोज शेंडे या तीन कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
Chandrapur Voter List Suspension प्रकरण नेमके काय आहे?
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 13(AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4(1) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही कारवाई केली आहे. मतदार यादीशी संबंधित निवडणूक विषयक अधिकृत कर्तव्य पार पाडताना झालेल्या गंभीर निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर ही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 मधील नियम 16 नुसार निलंबनाच्या कालावधीत सहा. शिक्षक श्री. येसांबरे, सहा. शिक्षक आनंद गेडाम, वेकोलीचे कर्मचारी सोनू ढुमणे, किरण रामटेके आणि मनोज शेंडे यांना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यवसाय करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध गैरवर्तनाची कारवाई करण्यात येईल. तसेच अशा परिस्थितीत त्यांना निर्वाह भत्त्याचाही लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






