Cooler Electric Shock घटनेनंतर चंद्रपूरच्या इंदिरानगर परिसरात कुलरजवळ नागरिकांची गर्दी आणि दुर्दैवी घटनेचे दृश्य.

Cooler Electric Shock । इंदिरानगरमध्ये विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 28, 2026

Cooler Electric Shock : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरु आहे, यापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिक आपल्या घरी कुलर लावत आहे, मात्र हा कुलर तुमचा जीव घेऊ शकतो अशी हादरविणारी घटना चंद्रपूर शहरात २८ मे रोजी घडली. कुलरमध्ये पाणी टाकताना बाप-लेकाचा विजेचा धक्का आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. (डिझल साठी शेतकऱ्यांना द्यावी लागणार ओळख)

इंदिरानगरातील Cooler Electric Shock घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरी जवळ राहणारे वामन मांडवे हे सकाळी चालू कुलर मध्ये पाणी टाकत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला, वडील खाली पडल्याचे दिसताच मुलगा राहुल मांडवे वडिलांजवळ गेला असता त्याला सुद्धा विजेचा जोरदार धक्का लागला अशी माहिती आहे. Cooler Electric Shock

या धक्क्यात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला, बाबत-लेकाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळून गेला, उन्हाळा येण्यापूर्वी महावितरणने नागरिकांना विजेच्या धक्क्यापासून आधीच सावध केले होते, कुलर ची वायरिंग ची बरोबर तपासणी करावी व चालू कुलर मध्ये पाणी टाकायच्या वेळेस कुलर बंद करणे अश्या सूचना महावितरणने दिल्या होत्या.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment