Chandrapur Congress News: चंद्रपूरमध्ये सुभाष धोटे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्कार व कार्यकर्ते उपस्थित

चंद्रपूर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल; धोटे यांची हॅटट्रिक नियुक्ती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

मे 27, 2026

Chandrapur Congress News : चंद्रपूर : देशभरात सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत माजी आमदार तथा नवनियुक्त चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची ‘हॅटट्रिक’ केली आहे. त्यांच्या या दांडग्या राजकीय आणि संघटनात्मक अनुभवाचा फायदा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसला नक्कीच होणार आहे, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. (शेतकऱ्यांना मिळणार केवळ ३० लिटर डिझल)

चंद्रपूर येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर बोलत होत्या. Chandrapur Congress News

Chandrapur Congress News जिल्हाध्यक्ष निवड आणि राजकीय घडामोडी

यावेळी व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, सुभाष धोटे यांचा पक्षातील कामाचा आणि संघटनेचा अनुभव फार मोठा आहे. त्यांच्या या पुनर्नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला नक्कीच एक नवसंजीवनी मिळणार आहे. आगामी काळात सर्वांनी गटातटाचे राजकारण बाजूला सारून एकसंधपणे पक्षाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. ते म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे, ती मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे पार पाडेन. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, अंतर्गत हेवेदावे बाजूला सारून काँग्रेस पक्ष अधिक बळकट आणि गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” असे मत त्यांनी व्यक्त केले.  Chandrapur Congress News

या सत्कार समारंभाला माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, सुभाष गौर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लाहमगे, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, झोन ३ सभापती रामनरेश यादव, ए. आय. पी. सी. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, नगरसेवक वसंता देशमुख, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक अभिषेक डोहीफोडे, नगरसेवक आकाश मानकर, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका महानंदा वाडके,

अंबिका दवे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, निसार शेख, सुवर्णा लोखंडे, मीनाक्षी गुजरकर, प्रतिभा पेंदाम, स्वप्नील कांबळे, शहजाद शेख, अतुल वाघमारे, आशिष बोन्डे, अतुल पिंपळकर, गुंजन येरमे, राज यादव, मोनू रामटेके, अनिल सुरपाम यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment