चंद्रपूर काँग्रेस बैठकीत बाला बच्चन, विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे पत्रकार परिषदेत

चंद्रपुरात काँग्रेसची ‘वोट बचाओ, देश बचाओ’ बैठक; १ नोव्हेंबरच्या दिल्ली महारॅलीत सहभागाचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 25, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर काँग्रेस बैठक हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर येथे झाली. ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानानिमित्त ही बैठक आयोजित केली होती. AICC चे जिल्हा निरीक्षक बाला बच्चन यांनी अध्यक्षस्थान भूषवले. काँग्रेस नेत्यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावरील महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. नेत्यांनी पत्रकार परिषदेत ‘मत चोरी’चा मुद्दा मांडला. हा त्यांचा आरोप आहे. (मन कि बात कार्यक्रमात मुनगंटीवार यांची मोठी घोषणा, जानेवारीत युवा संमेलन, वाचा हि बातमी)

चंद्रपूर काँग्रेस बैठक: अभियानाचा आढावा

लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) वतीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि AICC द्वारे चंद्रपूर जिल्ह्याचे नियुक्त निरीक्षक बाला बच्चन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

१ नोव्हेंबरच्या दिल्ली महारॅलीचे आवाहन

या बैठकीमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संघटनात्मक बांधणी आणि आगामी पक्षीय कार्यक्रमांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच येत्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानांवर आयोजित करण्यात आलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीत चंद्रपूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे जोरदार आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यवेक्षक म्हणून आलेल्या आ. बाला बच्चन यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेत उपस्थितांशी संवाद साधला. मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करणे, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ करणे आणि पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असा भर त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत ‘मत चोरी’चा मुद्दा

बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. बाला बच्चन, आ. विजयभाऊ वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी ‘वोट बचाव देश बचाओ’ अभियान, मत चोरीचा मुद्दा आणि दिल्लीतील महारॅलीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मान्यवरांनी ‘मत चोरी’ ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अधोरेखित केले. भारतीय लोकशाही, संविधान आणि नागरिकांचे अधिकार वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी तीव्र संघर्ष करत असून, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या महारॅलीमधे नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन नेत्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा राव पोलशेट्टी यांनी केले, तर मंच संचालन जिल्हा शहर अध्यक्ष मनीष तिवारी यांनी केले व आभार प्रदर्शन शहर महिला जिल्हा अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी मानले. या बैठकीत अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रदेश सचिव रोशनलाल बिट्टू, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, शहर महिला जिल्हा अध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. राम राऊत, प्रमोद बोरीकर, दीपक वाढई, श्यामकांत थेरे, सपना मोरे, पवन भगत, सुनीता गोवर्धन, नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा अल्काताई वाढई, माजी महापौर संगीता अमृतकर,

महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, दिनेश चोखारे, प्रवीण काकडे, भास्कर माकोडे, विजय घरत, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, गोविंदा उपरे, अशोक रेचनकर, नितीन गोहणे, वासुदेव पाल, रमाकांत लोधे, राजेंद्र चिकटे आणि शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख यांच्यासह काँग्रेसचे प्रादेशिक, जिल्हा व शहर स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाडी संघटनांचे प्रमुख, सेलचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment