चंद्रपूर: चंद्रपूर भाजप मन की बात कार्यक्रमाचे रविवारी (२५ ऑक्टोबर) एकत्र श्रवण करण्यात आले. भाजपच्या माहितीनुसार, महानगरातील सर्व ३९० बूथवर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम ऐकला. महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत ‘मन की बात जेन झी के साथ’ उपक्रम झाला. त्यात विद्यार्थी, युवक आणि पदाधिकारी सहभागी झाले. जोरगेवार यांनी नव्या पिढीने परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधावा, असे आवाहन केले. (सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, २४ तासात दोघांचा बळी)
चंद्रपूर भाजप मन की बात: ३९० बूथवर श्रवण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमाचे रविवारी चंद्रपूर महानगरातील सर्व ३९० बूथवर अत्यंत उत्साहात सामूहिक श्रवण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयासह महानगरातील सर्व ३९० बूथवर हा कार्यक्रम नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ऐकला. विशेषतः महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मन की बात जेन झी के साथ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक-युवती, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
‘मन की बात जेन झी के साथ’ उपक्रम
‘मन की बात’ हा केवळ एक संवादाचा कार्यक्रम नसून देशातील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेणारा आणि समाजातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा एक प्रभावी मंच असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधत विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीतील लोकसहभागाचे महत्त्व विशद करतात, असे मत व्यक्त करण्यात आले.
आमदार जोरगेवार यांचे आवाहन
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील सामान्य माणसाच्या असामान्य कार्याची ओळख संपूर्ण देशाला होत असते. समाजात अनेक व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या परीने राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देत असतात आणि अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेतल्यामुळे इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळते. आजच्या ‘जेन झी’ अर्थात नव्या पिढीमध्ये प्रचंड ऊर्जा, कल्पकता आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मोठी क्षमता असून, या ऊर्जेला योग्य व सकारात्मक दिशा मिळाल्यास देशाच्या विकासात तरुणांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या पिढीने देशाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेले राहून आधुनिक भारताच्या उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर महानगरातील सर्व ३९० बूथवर एकाच वेळी ‘मन की बात’चे श्रवण होणे हा भाजप कार्यकर्त्यांमधील उत्तम समन्वय आणि लोकसहभागातून जनसंवाद पोहोचविण्याच्या यशस्वी प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगण्यात आले. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागण्यासह राष्ट्रहिताच्या कार्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. भाजप महानगर कार्यालयासह शहरातील सर्व बूथवर या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे महानगरात व्यापक स्तरावर ‘मन की बात’ ऐकण्यात आली. विशेष बाब म्हणजे यापूर्वी मन कि बात कार्यक्रम कामगार वर्ग सह अल्पसंख्यांक समाजासोबत मन कि बात कार्यक्रमाचे श्रवण करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राज्य कार्यकारणी परिषद सदस्य तुषार सोम, ज्येष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री शाम कनकम, युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, नगरसेविका सविता कांबळे, ज्येष्ठ नेते पूनम तिवारी, सुरेश तालेवार, प्रमोद शास्त्रकार, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री, महानगर एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, प्रिन्स प्रसाद, रंजन ठाकूर, राकेश बोमनवार, छाया चवरे, रीना साखरकर आणि मनीषा पडगेलवार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






