चिमूर वाघ हल्ला झालेल्या खातोडा येथील धान शेताचे प्रातिनिधिक छायाचित्र

शेतात विसावा अचानक वाघ समोर आला…चिमुरात महिलेवर वाघाचा हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 25, 2026

चिमूर : चिमूर वाघ हल्ला प्रकरणात खातोडा शेतशिवारात एक महिला शेतकरी जखमी झाली. रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी सुमारे ३:३० वाजता ही घटना घडली. साधना जांभूळे (४५) धान पिकावर फवारणीसाठी शेतात गेल्या होत्या. कुटुंबाच्या सांगण्यानुसार, वाघ जवळ आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. पती धावून आले आणि वाघ जंगलाकडे गेला. त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वाचा हि बातमी)

चिमूर वाघ हल्ला: आरडाओरडीमुळे वाघ पळाला

पळसगाव (पि.) नेरी परिसरातील तपोभूमी गोंदेडा लगतच्या खातोडा शेतशिवारात रविवारी (दि. २५) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास धान पिकावर औषध फवारणी करणाऱ्या महिला शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला केला. मात्र, महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला असून, ती थोडक्यात बचावली आहे. साधना मधुकर जांभूळे (वय ४५, रा. खातोडा) असे जखमी महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, साधना जांभूळे या आपल्या पतीसह शेतात धान पिकावर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. पती फवारणीच्या कामात व्यस्त असताना त्या शेताच्या बांधावर विसावा घेण्यासाठी थांबल्या होत्या. यादरम्यान परिसरात दबा धरून बसलेला वाघ तिथे पोहोचला. झोपलेल्या महिलेच्या हालचालींमुळे वाघाने आपल्या पंजाने तिला पलटवले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे साधना यांना जाग आली. डोळे उघडताच समोर अवाढव्य वाघ दिसल्याने त्यांची भीतीने भंबेरी उडाली. परंतु, न घाबरता त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरड सुरू केली. पत्नीचा आवाज ऐकून पतीही तातडीने धावून आले. दोघांच्या संयुक्तिक आरडाओरड्यामुळे घाबरलेल्या वाघाने तेথून जंगलाच्या दिशेने पळ काढला.

जखमी महिलेवर चिमूर रुग्णालयात उपचार

या झटापटीत वाघाच्या पंजाच्या नखांमुळे साधना जांभूळे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे नेरी क्षेत्र सहाय्यक अधिकारी तोंडासे, वनरक्षक आळणे आणि वनरक्षक संभाजी वडझे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण या धाडसी आणि थरारक घटनेमुळे खातोडा व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने या परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment