चंद्रपूर मन की बात कार्यक्रम आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीचे प्रातिनिधिक छायाचित्र

चंद्रपुरात दोन आमदार, दोन मन कि बात कार्यक्रम; व्हॉट्सॲप संदेशाने वाद

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 25, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर मन की बात कार्यक्रमावरून रविवारी (२५ ऑक्टोबर) नवा वाद समोर आला आहे. शहरातील एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा संदेश कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास दंडाचा उल्लेख संदेशात होता. याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या १३९ व्या भागानिमित्त आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्र आयोजन केले होते. (३ गुराख्यांची शिकार करणारा वाघ जेरबंद)

३ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमाची सुरुवात केली होती, महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित होऊ लागला, देशातील नागरिकांशी संवाद साधने, सामाजिक उपक्रम, समाजातील प्रेरणादायी व्यक्ती, देशातील सकारात्मक घडामोडी, स्वच्छता, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवर या कार्यक्रमात चर्चा केली जाते. मागील १२ वर्षांपासून हा कार्यक्रम अविरत सुरु आहे.

चंद्रपूर मन की बात: दोन आमदारांचे स्वतंत्र आयोजन

एक दशक लोटल्यावर आता नागरिक या कर्यक्रमांकडे पाठ फिरवू लागले, निव्वळ आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी भाजप पक्षातील कार्यकर्ते आवर्जून हा कार्यक्रम ऐकतात, २५ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा १३९ वा भाग प्रसारित झाला, कार्यक्रम थेट प्रकाशित नसतो, तयारीनिशी याची स्क्रिप्ट आधीच तयार करण्यात येते. चंद्रपुरात मन कि बात कार्यक्रमाचे स्वरूप दिसावे यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले.

कार्यक्रमाला भव्य स्वरूप द्यावे हा दोन्ही आमदाराचा प्रयत्न मात्र गर्दी जमवायची कशी? हा प्रश्न समोर, तितक्यात आमदार मुनगंटीवार यांनी पक्षामार्फत विविध महाविद्यालय, प्रतिष्ठित नागरिक यांना विनंती करीत कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे आमदार जोरगेवार यांनी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी व्हाव्या याकरिता संदेश पाठविला. महाविद्यालयातील प्राचार्यानी विद्यार्थिनींना आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात आयोजित मन कि बात कार्यक्रमात सहभागी व्हावे असा संदेश व्हाट्सअप द्वारे पाठविला जर कार्यक्रमात अनुपस्थिती असणार तर दंड आकारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यामुळे विद्यार्थ्यांवर कार्यक्रमात उपस्थित होण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याची चर्चा रंगली. आज देशात सत्ताधारी यांना आपण थेट प्रश्न विचारू शकत नाही, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे आणि अश्या वातावरणात चंद्रपुरात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात येत असल्याने अनेकांनी यावर निषेध नोंदविला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment