वरोरा – वरोरा विदेशी दारू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बोर्डा ते आनंदवन मार्गावर सापळा रचून १९२९ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या मुद्देमालाची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे. वरोरा उपविभाग पथकाने या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी पोलिसांना हवा आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. (चेकिंगच्या नावाखाली सोने लुटलं, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका रॅकेटवर वरोरा उपविभाग पथकाने धडक कारवाई केली आहे. बोर्डा ते आनंदवन मार्गावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ८ हजार रुपयांच्या विदेशी दारूसह दोन जणांना अटक केली असून, या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरोरा विदेशी दारू जप्ती: बोर्डा-आनंदवन मार्गावर सापळा
प्राप्त माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोर्डा चौक ते आनंदवन चौकाकडे येणाऱ्या मार्गावर अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरोरा उपविभाग पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान पंचांसमक्ष एका वाहनाची आणि संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या तब्बल १९२९ नग विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी १ लाख ८ हजार रुपये किमतीचा हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून विनोद नथुजी वल्लादे (वय ३६) आणि समीर आरिफ शेख (वय २०, दोघेही रा. कोलारी वार्ड, वरोरा, जि. चंद्रपूर) या दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. तसेच, चौकशी दरम्यान या प्रकरणात दारासिंग संगतसिंग दुधानि (रा. कोलारी वार्ड, वरोरा) या अन्य एका आरोपीचे नाव समोर आले असून तो पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या (मदाका) कलम ६५(अ) आणि ८३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. परिसरातील अवैध धंद्यांवर वरोरा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “वरोऱ्यात १९२९ दारू बाटल्या जप्त; दोघांना अटक”