चंद्रपूर विदेशी दारू जप्त करणाऱ्या पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या बाटल्या

चंद्रपुरात नागपूरहून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली दारू, २ महिलांना अटक, प्रिन्स पसार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 16, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर विदेशी दारू जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावरकर चौक परिसरात केली. मध्य प्रदेशातील दोन महिलांकडून ३६ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने शहरात मोठी कारवाई करत नागपूरकडून एसटी बस किंवा ट्रॅव्हल्सने अवैध विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन महिलांना सावरकर चौक परिसरात सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपी महिलांच्या ताब्यातून सुमारे ३९ हजार ९२४ रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या ३६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमधील मुख्य ‘वाँटेड’ आरोपीचा शोध सुरू आहे. (भद्रावतीमध्ये तलवार जप्त, वाचा हि बातमी)

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घाबत असताना त्यांना नागपूरकडून गणराज ट्रॅव्हल्सने (क्र. MH 34 BZ 6748) काही महिला अवैध विदेशी दारू घेऊन शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सावरकर चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचला. नागपूरकडून आलेली संबंधित ट्रॅव्हल्स थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये संशयित हालचाली करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष महिलांच्या साहित्याची व बॅगांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ‘रॉयल स्टॅग’ (ROYAL STAG) या ब्रँडच्या प्रत्येकी ७५० मिलि लीटरच्या ३६ सीलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या दारूची बाजारभावानुसार एकूण किंमत ३९,९२४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेश कनेक्शन आणि मुख्य सूत्रधार ‘वाँटेड’

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची कसून चौकशी केली असता, त्या मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींमध्ये सन्नो मनोज जाट (वय ५२ वर्षे) आणि लक्ष्मी सुरेंद्र जाट (वय ४० वर्षे, दोन्ही रा. बेलगाव केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. या महिला नागपूरहून मोठ्या प्रमाणावर ही विदेशी दारू आणून चंद्रपूर येथील ‘प्रिन्स कंजर’ (रा. कंजर मोहल्ला, चंद्रपूर) या व्यक्तीला विक्रीसाठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दारू पुरवठा करणाऱ्या व मागविणाऱ्या प्रिन्स कंजर या वाँटेड आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

या धडक कारवाईमुळे चंद्रपूर शहरातील अवैध दारू तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर उपविभाग पथकाने ही कामगिरी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment