गडचांदूर: गडचांदूर विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २३ वर्षीय महिला १५ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री घरातून निघून गेली. पतीने सांगितल्यानुसार, तिने जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. तिची चार वर्षांची मुलगी घरीच आहे. नातेवाईकांनी शोध घेतला, पण माहिती मिळाली नाही. त्यामुळे पतीने १६ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. (ट्रॅव्हल्समधून दारू तस्करी. २ महिला ताब्यात, वाचा हि बातमी)
गडचांदूर विवाहिता बेपत्ता: १५ ऑक्टोबरच्या रात्री घर सोडले
गडचांदूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक २३ वर्षीय विवाहिता आपल्या चार वर्षांच्या पोटच्या मुलीला व पतीला घरीच सोडून अचानक निघून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, घर सोडण्यापूर्वी या विवाहितेने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने ‘बेटी आणि अपना ख्याल रखना’ (मुलीची आणि स्वतःची काळजी घ्या) असा संदेश लिहिला होता. या घटनेमुळे परिसरात व कुटुंबात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील ही विवाहिता १५ ऑक्टोबरच्या रात्री अचानक घरातून निघून गेली. नातेवाईक व कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर थकल्यानंतर पतीले १६ ऑक्टोबर रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात येऊन पत्नीच्या अचानक गायब झाल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत असत. मात्र, पत्नी अशा प्रकारे आपल्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला सोडून निघून जाईल, याचा अंदाज पतीला अजिबात नव्हता. आई अचानक घरातून निघून गेल्यामुळे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली असून, चिमुकल्या मुलीच्या भविष्याबाबतही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. विवाहिता नेमकी कोणत्या कारणांमुळे घर सोडून गेली, याचे गूढ अद्याप कायम आहे. सध्यातरी गडचांदूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, निघून गेलेल्या विवाहितेचा कसून शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “गडचांदूर मध्ये २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता; पतीची पोलिसांत तक्रार, पोलिसांकडून शोध सुरू”