नागभीड अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणी तपास करणारे तळोधी पोलीस

नागभीड तालुक्यात १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; तळोधी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 21, 2026

नागभीड – नागभीड अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यात समोर आली आहे. एका गावातून १६ वर्षांची मुलगी १९ ऑक्टोबर रोजी घरातून बेपत्ता झाली. तिच्या आईने तळोधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचा शोध सुरू आहे. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. कुणीतरी तिला फूस लावून नेले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

नागभीड अल्पवयीन मुलगी बेपत्ता कशी झाली?

नागभीड तालुक्यातील एका गावातून १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञाताने फूस लावून तिचे अपहरण केल्याच्या संशयावरून तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे घरीच राहून शेतमजुरीची कामे करत होती. घटनेच्या दिवशी सकाळी तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतमजुरीच्या कामासाठी शेतात निघून गेले होते. त्या वेळी मुलगी घरीच उपस्थित होती. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास आई-वडील शेतातून घरी परत आले असता मुलगी घरात दिसून आली नाही. (बोगस डॉक्टर करीत होता रुग्णांचा उपचार, वाचा बातमी)

सुरवातीला नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात तिची शोधशोध करण्यात आली. महाप्रसादासाठी ती गावातीलच नातेवाईकांकडे गेली असावी व रात्रीपर्यंत परत येईल, असा अंदाज बांधून कुटुंबीयांनी रात्री ९ वाजेपर्यंत तिची वाट पाहिली. मात्र, उशिरापर्यंत ती घरी न परतल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी इतर गावांतील नातेवाईकांकडे संपर्क साधून सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही.

अल्पवयीन मुलगी स्वतःहून कुठेही निघून जाण्याची शक्यता नसल्याने, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे पळवून नेल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने तळोधी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत असून बेपत्ता मुलीचा कसून शोध सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “नागभीड तालुक्यात १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; तळोधी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल”

Leave a Comment