बल्लारपूर – बल्लारपूर अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १६ वर्षीय मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे. संबंधित मुलगी १ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता नातेवाईकांना सांगून घराबाहेर पडली. मात्र ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचली नाही. नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. (तरुणीला रूम मध्ये डांबून चोरी, वाचा हि बातमी)
बल्लारपूर अल्पवयीन मुलगी अपहरण: नातेवाईकांची पोलिसांत तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास ती नातेवाईकांना सांगून घराबाहेर पडली, मात्र ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने आणि तिचा सर्वत्र शोध घेऊनही कोणताच सुगावा न लागल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. सर्व नातेवाईकांकडे तसेच संभाव्य ठिकाणी शोधशोध करूनही मुलगी मिळून आली नाही.
अल्पवयीन मुलगी स्वतःहून कुठेतरी निघून जाण्याची शक्यता नसल्याने, कोण्या अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा तातडीने शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






