Chandrapur Heatwave Alert अंतर्गत चंद्रपूरमध्ये तीव्र उन्हाचा परिणाम दिसत असून नागरिक सावधगिरी बाळगत आहेत

चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; रेड अलर्ट जारी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

मे 27, 2026

Chandrapur Heatwave : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून,  चंद्रपूर जिल्ह्यात 27 व 28 मे रोजी रेड अलर्ट तर 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट असून समोरचे काही दिवस ही लाट कायम राहणार आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (गोंडपिपरी मध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा)

Chandrapur Heatwave व हवामान विभागाचा इशारा

अशी घ्या काळजी : 1) तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5)  हलके, पातळ, सच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. Chandrapur Heatwave

6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. 7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी.

12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 15) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 16) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 17) दुपारच्या वेळेस मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे. Chandrapur Heatwave  

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू  करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर   यांच्या वतीने करण्यात येत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment