चिमूर: Chimur Lightning Strike Death मुळे चिमूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गदगाव येथे गुरुवारी दुपारी मुसळधार पावसात वीज कोसळल्याने १९ वर्षीय सुहास काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
सुहास हा बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने तो शेतातील कामासाठी गेला होता. दुपारी अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (हे हि वाचा – ब्रह्मपुरीत दहशत माजविणारी वाघीण जेरबंद)
मागील दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने सुहास घरच्या शेतीकामात मदत करण्यासाठी आणि गुरे चारण्यासाठी शेतात गेला होता.
दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. याच वेळी अचानक त्याच्या अंगावर कडकडून वीज कोसळली. विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने सुहासचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
गावात पसरली शोककळा
सुहास हा चिमूर येथील महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. अभ्यासाची आवड असूनही तो शेतीची जबाबदारी सांभाळून कुटुंबाला मोठा हातभार लावत असे. अत्यंत मेहनती, अभ्यासू आणि शांत स्वभावामुळे तो गावात सर्वांचा लाडका होता. प्रशासनाच्या सुट्टीमुळे घरी असलेला हा हुशार तरुण अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






