gondpipri jamin adhigrahan : गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी परिषदेत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत उभा राहील, अशी ग्वाही दिली. “शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून विकासाच्या नावाखाली अन्याय केला जाणार असेल, तर त्याविरोधात एक संघ होऊन रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (कुलर मध्ये पाणी भरताना बाप-लेकाचा मृत्यू)
gondpipri jamin adhigrahan वर शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
मागील काही महिन्यापूर्वी gondpipri jamin adhigrahan तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना उद्योग निर्मिती साठी gondpipri jamin adhigrahan बाबत शासनाकडून सूचनापत्र देण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी विरोधी भूमिका घेत संघर्ष कृती स्थापन करून आज स्थानिक गोंडपिपरी येथील माता कन्यका सभागृहात आज शेतकरी दुसऱ्या शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले.
आयोजित शेतकरी परिषदेस शेतकरी नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप, वंचित बहुजन आघाडी नेते तावाडे, ॲड. दिपक चटप, ॲड. बोधी रामटेके, किशोर वडेट्टीवार,संजय माडूरवार, शालिक माऊलीकर मोरेश्वर सूरकर, भारत चंद्रगडे, कमलेश निमगडे, राजेश कवठे, कवडुजी कुंदावार, ॲड. आस्वले, रामकृष्ण सांगळे, अजय माडूरवार, सूरज माडूरवार, राजू झाडे तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “जमीन ही शेतकऱ्यांची आई आहे. त्या मातीत त्यांचे आयुष्य, संसार आणि भविष्य दडलेले आहे. सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही परिस्थितीत १२ गावांतील शेतजमीन gondpipri jamin adhigrahan होऊ देणार नाही.”
सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. “एका बाजूला शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकी आणि नैसर्गिक संकटांशी झुंज देत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार त्यांची जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही,” तसेच शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “ही केवळ जमिनीची लढाई नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तर शेतकरी नेते माजी आमदार ॲड वामनराव चटप, ॲड दिपक चटप, ॲड बोधी रामटेके यांनी कायदेशीर बाबी समजावून देत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.
तत्पूर्वी शेतकरी परिषदेत काही एका वयोवृद्ध महिलेने डोळ्यातून अश्रू गाळत अन्यायाविरोधात थेट सरकार व स्थानिक आमदाराच्या नावाने आपल्या पारंपरिक कृतीतून बोटे मोडून संताप व्यक्त केला. तर याच परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत क्षेत्र आमदार देवराव भोंगळे यांना १२ गावात गावबंदी करण्यात आल्याचा ठरावही पारित केला. या नंतर उपस्थित नेते व शेतकरी यांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.
या शेतकरी परिषदेला परिसरातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, संघर्ष समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.