चंद्रपूर: चंद्रपूर एमडी ड्रग्ज विक्रीविरोधात शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. महाकाली कॉलरी परिसरात एमडी (मॅफेड्रॉन) विकणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला मध्यरात्री छापा मारून पकडण्यात आले. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने १० ऑक्टोबरच्या मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी उदय झाडे याच्या घरातून २.७१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. एकूण ३१,९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे करत आहेत. (महाकाय ट्र्क मधून वाळू तस्करी, एलसीबीची धडक कारवाई, वाचा हि बातमी)
चंद्रपूर एमडी ड्रग्ज प्रकरणात मध्यरात्री छापा
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती. महाकाली कॉलरी येथे राहणारा एक तरुण आपल्या राहत्या घराच्या परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची पक्की बातमी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने विलंब न लावता महाकाली कॉलरी परिसरातील संबंधित ठिकाणी सापळा रचून अचानक धाड टाकली.
महाकाली कॉलरीतून काय काय जप्त झाले?
पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत उदय तिरुपती झाडे (वय १८ वर्षे, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे २.७१ ग्रॅम वजनाचा एमडी पावडरचा साठा आढळून आला. याशिवाय ड्रग्जचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे २ इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, एमडी पावडरचे छोटे पॅकेट्स तयार करण्यासाठी ठेवण्यात आलेला प्लास्टिक पिशव्यांचा बंडल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ३१,९४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी उदय झाडे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक १०२०/२०२६ नुसार कलम ८(क), २१(ब), अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे, पोलीस हवालदार रूपेश, संतोषकुमार, संतोष, जावेद, संजय, नापोअ कपूरचंद, पोअ विक्रम, योगेश, खेडेराव, प्रशांत, सुशांत, प्रफुल तसेच महिला पोलीस अंमलदार सारीका, दिपीका आणि लिना यांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून ही धडक कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






