Chandrapur LCB Police Action दरम्यान जप्त केलेला मुद्देमाल

चंद्रपुरात एलसीबीची धाडसी कारवाई; १.४४ लाखांच्या एमडी ड्रग्जसह सराईत आरोपी गजाआड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 29, 2026

चंद्रपूर: Chandrapur LCB Police Action अंतर्गत चंद्रपूर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड मारली. त्यामुळे एमडी ड्रग्जची विक्री करणारा सराईत आरोपी रंगेहाथ पकडला गेला.

ललित उर्फ आर्यन बादल कंजर (वय ३८ वर्ष, रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (हे हि वाचा – बल्लारपुरात एमडी विक्री करणारे २ अल्पवयीन ताब्यात)

तसेच पोलिसांनी त्याच्याकडून १८.९५ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. याशिवाय एक महागडा ५जी मोबाईल देखील हस्तगत केला. त्यानंतर आरोपीवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २८ जुलै रोजी रात्रीच्या वेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी ललित कंजर याने त्याच्या जलनगर वॉर्डातील जुन्या घरी विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे ‘एमडी’ ड्रग्ज पावडर आणून ठेवली आहे. बातमीची शहानिशा होताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करण्यात आले.

त्यानंतर एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यातील तरतुदींनुसार पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. पंचांच्या समक्ष, फोटोग्राफर व शासकीय वजन काटेवाल्यासह आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकण्यात आला. कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपीची व घराची कसून झडती घेतली असता, ९४ हजार ७५० रुपये किमतीची १८.९५ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज पावडर आणि ५० हजार रुपये किमतीचा ओप्पो रेनो १५ ५जी मोबाईल असा एकूण १,४४,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमालासह आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८ (क), २२ (ब), आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपीला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि योगेश हिवसे, सपोनि दीपक कांकडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, सर्वेश बेलसरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment