बल्लारपूर: Ballarpur MD Drugs Seized प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी पेपरमील कॉलनीत छापा टाकला. त्यामुळे एमडी ड्रग्ज विकणारे दोन अल्पवयीन तरुण पकडले गेले. तसेच त्यांच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – कमिशनसाठी अल्पवयीन मुलगा विकतोय एमडी पावडर)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २८ जुलै रोजी बल्लारपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पेपरमील कॉलनीतील कन्नमवार वॉर्ड परिसरात काळ्या व ग्रे रंगाचा टी-शर्ट घातलेले सुमारे १८ वर्षे वयाचे दोन तरुण दुचाकीने एमडी ड्रग्जची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार होते. माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने पंचांसमक्ष परिसरात सापळा रचून कारवाई केली. संशयित तरुणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घातक अंमली पदार्थ आढळून आला.
कारवाईत ४.४५० ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जप्त झाली. तसेच याची किंमत २२ हजार ९२० रुपये आहे. याशिवाय १ लाखांची टीव्हीएस दुचाकी जप्त केली. त्याचप्रमाणे ५० हजारांचा आयफोन आणि डिजिटल वजन काटा हस्तगत केला.
जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल आणि वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनास्थळीच रीतसर पंचनामा केला. फिर्यादीच्या लेखी अहवालावरून आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडित, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, महेश कुकूडकार, लखन चव्हाण, वैभव गाडगे, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी आणि महिला पोलीस अंमलदार अनिता नायडू यांच्या पथकाने ही धडक कामगिरी केली. या घटनेमुळे बल्लारपूर शहरातील ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






