Krantiveer Sidam Chandrapur ची मध्यप्रदेश नाट्य विद्यालयात निवड

चंद्रपुरातील क्रांतीवीर सिडामची मध्यप्रदेश नाट्य विद्यालयात निवड; १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवणारा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 29, 2026

चंद्रपूर – Krantiveer Sidam Chandrapur याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याची मध्यप्रदेश नाट्य विद्यालयात निवड झाली. तसेच त्याला १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे चंद्रपुरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले.

त्यात यंदा महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून क्रांतिवीरने ही संधी मिळवली असून त्याला १०० टक्के शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणाची या प्रतिष्ठित नाट्य विद्यालयात झालेली ही पहिलीच निवड आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर व यवतमाळ मधील शेतकऱ्यांना विमा हफ्त्यात दिलासा)

महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड; १०० टक्के शिष्यवृत्ती प्राप्त

क्रांतीवीरच्या घरी उदरनिर्वाहासाठी केवळ दीड एकर कोरडवाहू शेती आहे. वडील गवंडी काम करून तर आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत असताना त्यांनी मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण, उमरी येथील आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला.

मात्र त्यात अपयश आल्याने दोन वर्षे वडिलांसोबत गवंडी काम केले. त्यानंतर पुन्हा शिक्षणाची वाट धरत चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. याच काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्याच्या कलागुणांना नवी दिशा मिळाली.

शालेय जीवनापासूनच नाटक, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या क्रांतिवीरने आपल्या गावात ‘क्रांती यूथ क्लब’ची स्थापना केली. पथनाट्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य सुरू केले. राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ‘जेंडर अँड आयडेंटिटी’ या नाटकात भूमिका केली. ‘क्रांतीज्योती’ या नाटकातील अभिनयासह पूर्व विदर्भात ५० हून अधिक पथनाट्यांतून त्याने सामाजिक जनजागृती केली.

‘मानव-वन्यजीव संघर्ष’ या एकांकिकेचे दिग्दर्शन आणि अभिनय करून त्याने गोंडवाना विद्यापीठ आयोजित झाडीबोली नाट्य संमेलनात उत्कृष्ट एकांकिकेचा सन्मान मिळवला. तसेच माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार आणि खा.जतिराम बर्वे यांच्या जीवनावर आधारित नाटकांचे दिग्दर्शन व अभिनयही केला. विद्यार्थी विकास विभागांतर्गत सादर केलेल्या लघुपटाला अकोला येथे आयोजित इंद्रधनुष्य २०२५ महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला.

रील, मिमिक्री आदी स्पर्धांमध्येही त्याने विद्यापीठ व राज्यस्तरीय पारितोषिके पटकावली आहेत. ग्रामीण भागातून कोणतीही नाट्यशिक्षणाची पार्श्वभूमी नसताना देशातील प्रतिष्ठित नाट्य विद्यालयात प्रवेश मिळवणारा क्रांतिवीर सिडाम हा चंद्रपूर जिल्ह्यातील नव्या पिढीच्या कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जागृत संस्थेतर्फे क्रांतीवीरचा सत्कार

चंद्रपूरातील जागृत संस्थेत स्वयंसेवक म्हणून क्रांतीवीरने कार्य केले आहे. आदिवासी तरुणांमध्ये कलाक्षेत्राबाबत मार्गदर्शन आणि जनजागृतीसाठी त्याने संस्थेच्या माध्यमातून योगदान दिले आहे. देशातील प्रतिष्ठीत मध्यप्रदेश नाट्य विद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल जागृत संस्थेचे संचालक अविनाश पोईनकर तसेच सुरज दहागावकर, शुभम वडस्कर यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका, शाल व पुस्तके देवून सन्मान केला. ग्रामीण भागातील आदिवासी व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी क्रांतीवीरने आदर्श निर्माण केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment