Ghagarphodo Andolan । अमृत २ निकृष्ट योजनेवरून चंद्रपुरात युवासेना आक्रमक, महाविकास युवक आघाडीचे घागरफोडो आंदोलन

Ghagarphodo Andolan : चंद्रपूर : शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेतर्पेâ अमृत जल योजनेची संकल्पना अस्तित्वात आली. त्यासाठी ज्या भागात नळाचे नव्हते अश्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आले तिथे नागरिकांना लवकरच पिण्याचे पाणी मिळेल असे आश्वासन देण्यात आले. परंतू अनेक ठिकाणी नळाचे पाईप लाईन तर लावण्यात आले परंतू त्याला पाणी मात्र अजुनपर्यंत आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. (जनगणना कामाची जिल्हाधिकारी पंत यांनी केली पाहणी)

Amrut योजना २ चे कंत्राट ज्या लक्ष्मी कंस्ट्रक्शनला २१८ कोटींमध्ये देण्यात आले त्या कंत्राटदाराने वर्क ऑर्डर मध्ये दिलेल्या नियम अटी शर्तीला बगल देवून पालिकेत काम करणार्‍या काही अधिकारी अभियंते तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाच्यांना हाताशी घेवून गुणवत्ताहीन कामे केली. अश्या सर्व दोषी अधिकारी व कंत्राटदाराविरोधात आयुक्तांना निवेदन देण्यात आले तसेच प्रत्यक्षात त्यांना कामे दाखविण्यात आल्यानंतरही अजुनपर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.

अश्याा दोषी आणि भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेस व युवासेना या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे १ जुन रोजी महानगरपालिकेच्या आवारात घागर फोडो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी आज ३० जुन रोजी आयोजित पत्रपरिषदेत केला.

Ghagarphodo Andolan का करण्यात येणार?


चंद्रपूर महानगरपालिके (Chandrapur CMC) मार्फत अमृत २ (Amrut) ही योजना शहरातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी सुरु करण्यात आली. या योजनेच्या घोषणेनंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. सदर योजनेचे काम मे. लक्ष्मी कंस्ट्रक्शनला २१८ कोटीत देण्यात आले. त्यांनी शहरातील अनेक मार्गावर नविन पाईपलाईन टाकण्याच्या उद्देशाने खड्डे खोदून ठेवले. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतू सदर खड्डे बुजवितांना मात्र कंत्राटदाराने हयगय केल्याने व निकृष्ट दर्जाचे सामाना वापरल्याने अनेक भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

यामुळे अनेकदा अपघातांनाही नागरिकांना सामोरे जावे लागले. त्यानंतर अनेक भागात नळाचे पाईपलाईन टाकण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आज ना उद्या पाणी मिळेल या आशेवर समाधान व्यक्त केले. परंतू त्यांची ही आशा काही दिवसातच फोल ठरली. आजतागायत अनेक भागात पाण्याचा एक थेंबही आला नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेग निर्माण झाला होता. याबाबत युवासेना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्पेâ आयुक्तांना जाब विचारला असता आयुक्तांनी कोणताही कारवाई केली नाही.

त्यानंतर याबाबतचे अनेक तक्रार लेखी स्वरुपात आणि प्रत्यक्ष मुलाखत घेवून उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे , अप्पर मुख्य सचिव नगरविकास, मा. मुख्य अभियंता, म.जि.प्रा. नागपूर विभागीय कार्यालय, महापौर चंद्रपूर मनपा यांना कळविल्यानंतरही सदर कंत्राटदार किंवा संबंधित अधिकार्‍यांवर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील २ ते २.५ वर्षापासून चंद्रपूर शहराची जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.

याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकारी हे आहेत म्हणून चंद्रपूर जनतेला वेठीस धरणार्‍या प्रशासन कंत्राटदाराच्या विरोधात कार्यवाही व्हावी याकरीता महाविकास युवक आघाडी शिवसेना, युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या तर्फे प्रशासनाला जाब विचारण्याकरीता दिनांक १ जुन रोजी ला महानगरपालिके समोर चंद्रपूर शहरातील पिडीता नागरिकांना सोबत घेवून घागरफोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. सदर पत्रपरिषदेला बबलू इसा, कलाकार मल्लारप, सुरज चव्हाण, राजेश कुमार, समिर खान, अमोल मेश्राम व गौरव रॉय यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर (chandrapur) मनपात भाजप-उबाठा सत्तेत आहे, आणि घागरफोडो आंदोलन हे उबाठा चे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे करीत आहे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाला जनतेच्या पैश्याचा अपव्यय कसा होत आहे हे दिसत आहे तर मनपात सत्तेत बसलेल्या उबाठा च्या नगरसेवक पदाधिकारी हे यावर मृग गिळून बसून आहे. जनतेच्या हिताचे कामे करण्यासाठी उबाठा सत्तेत बसली आहे कि जनतेच्या पैश्याचा अपव्यय बघण्यासाठी? या आंदोलनाच्या निमित्ताने चंद्रपुरात शिवसेनेच्या विरोधात शिवसेना उभी झाली आहे.

Leave a Comment