Yuva Sena Speech Contest चंद्रपूर सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026

Yuva Sena Speech Contest: चंद्रपुरात सडेतोड वक्तृत्व स्पर्धा, 10 हजारांचे बक्षीस

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 6, 2026

चंद्रपूर: Yuva Sena Speech Contest अंतर्गत चंद्रपूरमध्ये बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य जिल्हास्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना चंद्रपूरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत “व्हिजन महाराष्ट्र 2050” आणि “राजकारण व समाजकारणात युवकांची भूमिका” यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. 18 ते 35 वयोगटातील युवकांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. (शेतमाल खरेदी विक्रीसाठी परवाना आवश्यक)

युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक हर्षलदादा काकडे व युवासेना राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या सूचनेनुसार ही स्पर्धा आकारास येत आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या धडाडीच्या नेतृत्वात युवासेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने या भव्य “सडेतोड वक्तृत्व स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले असून “युवकांचे विचार… महाराष्ट्र घडवणार!” हा या स्पर्धेचा मुख्य गाभा आहे.

Yuva Sena Speech Contest ची संपूर्ण माहिती

येत्या रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील वरोरा नाका, नागपूर रोड येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही स्पर्धा पार पडणार आहे. तरुणाईच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेत ‘व्हिजन महाराष्ट्र २०५०’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका’ हे दोन अत्यंत महत्त्वाचे व कळीचे विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले सडेतोड विचार मांडण्यासाठी एकूण १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. विशेष म्हणजे वक्तृत्व क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे प्रवेश शुल्क पूर्णपणे निशुल्क म्हणजेच विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला १०,००० रुपये रोख, द्वितीय क्रमांकाला ५,००० रुपये रोख आणि तृतीय क्रमांकाला ३,००० रुपये रोख अशा आकर्षक बक्षिसांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, सोबतच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक वक्त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक आणि वक्तृत्व क्षेत्रात आवड असणाऱ्या सर्व इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन आपल्या वाणीची आणि विचारांची ताकद सिद्ध करावी, असे जाहीर आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी केले आहे. स्पर्धेतील नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी स्वप्नील पाटील यांच्याशी ७६२०७०६५६९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment