Fake Police Scam Chandrapur प्रकरणातील फसवणुकीनंतरची माहिती

Fake Police Scam Chandrapur । चंद्रपुरात ४ तोतया पोलिसांचा धुमाकूळ, 2.80 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 1, 2026

Fake Police Scam Chandrapur : चंद्रपूर – आम्ही पोलीस आहोत, तुम्ही आपल्या अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू नये, आम्हाला आदेश आहे, आपण दागिने काढा, खिश्यात ठेवू नका, आमच्याजवळ पुडी आहे त्यामध्ये ठेवा असे म्हणत काही इसमांनी ५४ वर्षीय अजय शंकरराव अल्लूरवार यांचे २ लाख ८० हजारांचे दागिने लंपास करीत पळ काढला. यावर शहर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (विवाहित महिलेची प्रियकराने केली हत्या)

Fake Police Scam Chandrapur : फसवणुकीची संपूर्ण पद्धत

१ जून रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मेडिकल व्यवसायी अजय अल्लुरवार हे आपल्या घरून दुचाकीने माधव दूध डेअरी मध्ये दूध घेऊन परत येत होते, त्यावेळी दोन दुचाकीवरील चार इसमांनी त्याना थांबविले. त्यांनी आपले पोलीस आयकार्ड त्यांना दाखविले. आम्ही पोलीस असून तुम्ही असे भर रस्त्यात दागिने घालून फिरू नका, असे म्हणत त्यांनी अल्लुरवार यांच्या सोन्याची चैन, अंगुठी व कडा काढण्यास सांगितले.

अल्लुरवार आपल्या अंगावरील दागिने काढले व ते खिश्यात ठेवत असताना त्या चार पोलिसांनी त्यांना दागिने पडणार थांबा माझ्याकडे कागद आहे, तुम्ही त्या पुडी मध्ये टाका, एकाने अल्लुरवार यांना त्यांच्या दुचाकींचा क्रमांक विचारला असता तितक्यात त्या पोलिसांनी हात चलाखी करीत दोन पुड्या अल्लुरवार यांना दिल्या. व या पुड्या गाडीच्या डिक्कीत ठेवा म्हणजे दागिने सुरक्षित राहतील.

अल्लुरवार पुढे निघाले मात्र काही अंतरावर त्यांनी गाडीच्या डिक्कीतील पुडी बाहेर काढली त्यामध्ये सोन्याच्या दागिण्या ऐवजी धातूच्या सहा अंगुठ्या व पिवळ्या रंगाचा कडा आढळून आला. त्यावेळी ते बनावट पोलीस असल्याचे त्यांना समजले. पोलीस कार्ड दाखवून त्या तोतया पोलिसांनी अल्लुरवार यांच्याजवळील दागिने असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लुटला. याबाबत अल्लुरवार यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. शहर पोलिसांनी यावेळी त्या ४ तोतया पोलिसांविरोधात कलम ३ (५), ३१८(४) व ३१९ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment