चंद्रपूर: Chandrapur Farmhouse Gambling Raid अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने स्वातंत्र्यदिनी बोर्डा गावातील फार्महाऊसवर मोठी कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या हाय-प्रोफाईल जुगार अड्यावर धाड टाकली आहे. छाप्यात हॉटेल चालकासह १६ जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळावरून रोख रक्कम, वाहने आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. एकूण ४७ लाख ६४ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – पोलिसांची कानपा टेकडीवर धाड, ६ जुगारी ताब्यात)
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी बोर्डा गावातील फार्महाऊस येथे काही लोक बेकायदेशीरपणे हार-जितीचा जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती. बातमीची खातरजमा होताच चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या शोध पथकाने अत्यंत गोपनीयतेने नियोजन करून फार्महाऊसवर धाड टाकली.
या कारवाईदरम्यान फार्महाऊसवर जुगार खेळणारे व खेळवणारे १५ लोक आणि जुगार अड्डा चालवणारा हॉटेल चालक असे एकूण १६ जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, मोठी रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण ४७ लाख ६४ हजार ९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक १०१४/२०२६ कलम ४ आणि ५ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मिलींद दोडके, मनीषा मोरे, पंकज ठोंबरे, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, ब्यूटी साखरे, सूरज शेडमाके, मंगेश शेंडे, कुमोद खनके, संदीप भोयर, संजू देशीवाले, संदेश चुनारकर, सतीश डांगे आणि राकेश पिंपळकर यांच्या पथकाने थेट सहभाग नोंदवला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






