Sindewahi Police Raid action on gambling spot

सिंदेवाहीत झाडाखालील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ७ जणांना रंगेहाथ पकडले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 23, 2026

सिंदेवाही : Sindewahi Police Raid सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ते पुरकेपार रस्त्यादरम्यान झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ७ जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – मंदिरातील दानपेटी फोडली, गुन्हा दाखल)

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ते पुरकेपार रस्त्यादरम्यान झाडाखाली सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी यशस्वी धाड टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कमेसह एकूण सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sindewahi Police Raid: गुप्त माहितीवरून रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पथक नवरगाव ओपी हद्दीत प्रोव्हिशनल जुगार रेड संदर्भात गस्त घालत असताना पोलिसांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. रत्नापूरवरून पुरकेपार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका मोकळ्या जागेत झाडाखाली काही इसम ५२ ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून कटपत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे खबर मिळताच पोलीस पथकाने दोन पंचासमक्ष त्या ठिकाणी सापळा रचला.

पोलिसांनी घटनास्थळी लपत-छपत जाऊन अचानक छापा टाकला असता, त्या ठिकाणी सात जण रंगेहाथ जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. या कारवाईत जुगाराच्या डावावरून आणि संशयितांच्या अंगझडतीमधून रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण २,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पैशांची बाजी लावून जुगार खेळल्याप्रकर्णी सिंदेवाही पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराच्या तक्रारीवरून सर्व सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सिंदेवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment