Warora Jagannath Temple Theft CCTV footage police investigation

वरोरा येथे जगन्नाथ बाबा मंदिरात भरदिवसा चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 22, 2026

वरोरा : Warora Jagannath Temple Theft ची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वरोरा शहरातील शिवाजी वार्डात असलेल्या प्रसिद्ध जगन्नाथ बाबा मंदिरात भरदिवसा चोरी झाली. अज्ञात तीन चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा लॉक उघडून आत प्रवेश केला. त्यांनी स्टीलची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. (गडचांदूरात वीज मीटरमध्ये छेडछाड, गुन्हा दाखल)

Warora Jagannath Temple Theft : भरदिवसा मंदिराची दानपेटी फोडली

हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यंकर वार्ड येथील रहिवासी आणि सीडीसीसी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी मेघनाथ वासुदेव कुरेकार (वय ६३) यांनी २०२२ मध्ये धनोजे कुणबी समाज हॉलजवळ जगन्नाथ बाबांचे मंदिर उभारले असून ते स्वतः मागील पाच वर्षांपासून मंदिराची देखभाल व सेवा करतात. काल, २० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास त्यांनी मंदिरात नियमित पूजा केली आणि दानपेटीला कुलूप लावून मंदिर सुरक्षित असल्याचे पाहून ते घरी निघून गेले होते.

दरम्यान, सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास मंदिराचे शेजारी भाऊराव पेचे यांनी कुरेकार यांना दूरध्वनीवरून मंदिरातील दानपेटी फुटलेल्या अवस्थेत असल्याचे कळवले. माहिती मिळताच कुरेकार यांनी ६:३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तुटलेले आढळले आणि त्यातील अंदाजे ३ हजार ते ४ हजार रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दुपारच्या सुमारास तीन मुलांनी मंदिरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून दानपेटी फोडल्याचे आणि त्यातील पैसे काढून पसार होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

या प्रकरणी मेघनाथ कुरेकार यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी अज्ञात तीन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक ओमप्रकाश शामराव सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार आणि पोहवा रवींद्र मडावी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment