Warora ATM Theft Attempt CCTV Footage Analysis

वरोऱ्यात एटीएममध्ये शिरला अन्… सीसीटीव्ही फुटेज समोर!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 20, 2026

वरोरा – Warora ATM Theft Attempt ची एक थरारक घटना वरोरा येथील वणी बायपास रोडवर नुकतीच घडली आहे. साई मंगल कार्यालयासमोर असलेल्या ‘फिन्दी’ कंपनीचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केला.

मात्र, मशीनचे मुख्य लॉक न तुटल्यामुळे सर्व रोकड सुरक्षित राहिली. हा संपूर्ण प्रकार एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बनावट व्हिडीओ, आणि ९ लाखांची फसवणूक)

Warora ATM Theft Attempt: वरोरा शहरातील घटनेचा घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील कर्मवीर वॉर्डातील रहिवासी राजेंद्र शिवदास वाटकर (वय ४८) हे वणी बायपास रोडवरील साई मंगल कार्यालयासमोर ‘फिन्दी’ एटीएमची फ्रँचायझी चालवतात. १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे एटीएम मशीनमध्ये रोकड लोड केली आणि मशीनचे लॉक व्यवस्थित असल्याची खात्री करून ते निघून गेले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राजेंद्र वाटकर हे पुन्हा एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी गेले असता, त्यांना मशीनच्या समोरील पल्ला व आतील मुख्य लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

मशीनची छेडछाड झाल्याचे लक्षात येताच वाटकर यांनी तात्काळ एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी १७ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पँट आणि शर्ट परिधान केलेला, गोऱ्या रंगाचा व गोल चेहऱ्याचा एक अज्ञात इसम एटीएममध्ये दाखल झाल्याचे दिसले. या चोरट्याने मशीनचा समोरील भाग ओढून तोडला व आतील लॉक फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्य लॉकर न उघडल्याने आणि पैसे बाहेर काढता न आल्यामुळे तो रिकाम्या हाताने पसार झाला.

या घटनेनंतर राजेंद्र वाटकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगत तोंडी तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोंटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश ज्ञानोबा जांबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment