Sonam Wangchuk Agitation Chandrapur MNS Fasting Protest

चंद्रपुरात उपोषणाची हाक; जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेने मागितली परवानगी!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 20, 2026

चंद्रपूर: Sonam Wangchuk Agitation Chandrapur च्या समर्थनासाठी आता चंद्रपूरमधील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी मनसे कामगार सेनेने उपोषणाची तयारी दर्शवली आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने उपोषण आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडे औपचारिक निवेदनाद्वारे परवानगी मागण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी होणार)

Sonam Wangchuk Agitation Chandrapur : चंद्रपुरात उपोषणाची तयारी

मनसे कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस अमन अंधेवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारताच्या संविधानातील अनुच्छेद १९ अन्वये प्राप्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या अधिकाराचा वापर करून हे उपोषण करण्यात येणार आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात देशहित, विद्यार्थ्यांचे हित, लोकशाही मूल्यांचे रक्षण, पर्यावरण संवर्धन आणि शासनाने जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधावा, या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, कथित परीक्षा गैरव्यवहार व पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी ठोस धोरण आखणे या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित न्याय्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे हे उपोषण आंदोलन पूर्णपणे अहिंसक, लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच पार पाडले जाईल, अशी ग्वाही संघटनेतर्फे देण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, कोणत्याही सार्वजनिक वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे सांगत प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन मनसे कामगार सेनेने दिले आहे. पर्यावरण संरक्षण, हिमालयीन प्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या धोरणांसोबतच लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचा सन्मान केला जावा, ही या उपोषणाची मुख्य भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर, मनसे कामगार सेनेने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे उपोषणासाठी तात्काळ परवानगी देण्याची मागणी केली असून, आंदोलनादरम्यान योग्य पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे आणि शांततापूर्ण मार्गाने सहभागी होणाऱ्या नागरिकांवर कोणतीही अनावश्यक कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंतीही केली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी तसेच रामनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही माहिती व आवश्यक कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे. आता या अर्जावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि उपोषणाला कधी परवानगी मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment