चंद्रपूर – Chandrapur Student Protest अंतर्गत चंद्रपूर शहरात आज हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत नीट पेपर लीक विरोधात आणि सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. वारंवार होणाऱ्या पेपर लीकमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी तीव्र मागणी या वेळी करण्यात आली. (सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मनसे मैदानात)
Chandrapur Student Protest : चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
वारंवार लीक होणारे नीट पेपर विरोधात दिल्ली मध्ये सुरु असलेल्या सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आज देशभरात विद्यार्थ्यांनी भव्य निदर्शने आंदोलन केले, या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत नीट पेपर लीक व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली.
वारंवार नीट पेपर लीक होत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, २० च्या जवळपास विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, या शिक्षण व्यवस्थेतील त्रुट्या दूर व्हाव्या अशी मागणी करीत सोनम वांगचुक हे मागील २० दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते, मात्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, उलट उपोषण स्थळावरून त्यांना जबरदस्ती उचलून नेले.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करीत शिक्षण मंत्र्यांसह पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली. २० जुलै रोजी दिल्ली मध्ये संसद मार्च आयोजित केला होता, यासाठी देशभरातील सर्वच भागात विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मोर्चा व निदर्शने केली.
भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असून त्या व्यवस्थेत सुधार व्हावा व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी चंद्रपुरातील आंदोलनात विद्यार्थ्यांनी केली. चंद्रपुरातील झालेल्या निदर्शन आंदोलनात शहरातील हजारो विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






