चंद्रपूर: Maharashtra Bandh Chandrapur अंतर्गत आज संपूर्ण चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात आंदोलनाचा तीव्र प्रभाव पाहायला मिळाला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या हाकेला चंद्रपुरात नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. शहरातल्या बाबुपेठ परिसरात हजारो नागरिकांनी एकत्र येत चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर थेट रस्ता रोको आंदोलन केले. (हे हि वाचा – शिक्षणमंत्र्यांच्या खुर्चीला शाप))
नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू होते. या शांतीपूर्ण आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करत बळाचा वापर केला. लहान मुले, मुली आणि ज्येष्ठांनाही पोलिसांनी सोडले नाही. या घटनेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर मोदी सरकारने बळाचा वापर करणे अत्यंत चुकीचे असून, या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या हाकेला राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
चंद्रपुरात बाबुपेठ येथे ‘रस्ता रोको’
या बंदला राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. शहरातील बाबुपेठ परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर एकत्र येत थेट ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या रस्ता रोको आंदोलनात हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
संसद मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवर अत्याचार
लडाखमधील मागण्यांसाठी सोनम वांगचुक मागील २५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न देता बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देशभरातील युवकांनी एकत्र येत २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवरून ‘संसद मार्च’चे आयोजन केले होते. मात्र, या मार्चदरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला.
“मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा तीव्र निषेध”
या घटनेनंतर देशातील युवा वर्ग आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. “जोपर्यंत देशात मोदी सरकार राहील, तोपर्यंत नागरिकांना गुलामासारखी वागणूक दिली जाईल,” असा घणाघाती आरोप आंदोलकांनी या वेळी केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






