dharmendra pradhan resignation demand memorandum by mla sudhakar adbale

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या; विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पंतप्रधानांना निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 24, 2026

चंद्रपूर : Dharmendra Pradhan Resignation Demand ही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून लावून धरण्यात आली आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत भारताच्या पंतप्रधानांना २३ जुलै रोजी निवेदन पाठवण्यात आले. आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. (कांग्रेस नगरसेविकेवर गुन्हा दाखल करा, चंद्रपूर भाजपची मागणी)

या मागणीसंदर्भात संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत भारताचे पंतप्रधान यांना आज २३ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात देशातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच, नीट पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, या प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, अशा घटनांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जंतर-मंतर, दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला असल्याचेही यावेळी सांगितले.

देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता अबाधित राहावी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने स्पष्ट केले.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment