ballarpur bjp police complaint submitted to sp ayush nopani by alka atram

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; काँग्रेस नगरसेविकेवर कारवाईसाठी भाजप आक्रमक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 23, 2026

चंद्रपूर – ballarpur bjp police complaint मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बल्लारपूर शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका अॅड. मेघा भाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अलका आत्राम यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार)

निवेदनात संबंधित व्हिडिओतील भाषा सार्वजनिक जीवनातील जबाबदार व्यक्तीस शोभणारी नसून लोकशाही मूल्ये, संविधानिक संस्थांचा सन्मान आणि सार्वजनिक सभ्यतेचा अवमान करणारी असल्याचे म्हटले आहे. नगरसेविका आणि वकील या पदावर असलेल्या अॅड. मेघा भाले यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे गंभीर बाब असून त्याची सखोल चौकशी करून भारतीय कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वकील म्हणून त्यांच्या वर्तनाची शासनाने गंभीर दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी महापौर संगीता खांडेकर, भाजप जिल्हा महामंत्री नीलम सुरमवार, पोंभूर्णा नगराध्यक्ष सुलभा पिपरे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, छबू वैरागडे, नम्रता ठेमस्कर, वंदना सिंहा, मायाताई उईके, चंद्रकला सोयाम, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री लक्ष्मी सागर व मुग्धा खाडे,  सविता सरकार,  शिला चव्हाण, वंदना संतोषवार, कल्पना बगुलकर, जया लोहे, त्रिवेना जगताप, मोनिशा महतव, सुप्रिया सरकार  यांची उपस्थिती होती.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment