Gadcandur Electricity Theft Case mahavitaran action police station

गडचांदूर येथे वीज मीटरमध्ये छेडछाड करून चोरी; दुसऱ्यांदा गुन्हा केल्याने महावितरणची धडक पोलीस कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 22, 2026

गडचांदूर : Gadcandur Electricity Theft Case मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. गडचांदूर येथील एका वीज ग्राहकाने बेकायदेशीरपणे मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केली. आरोपीने यापूर्वीही असाच प्रकार केला होता. आता दुसऱ्यांदा गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

१० फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरणच्या पथकाने ही पाहणी केली. तपासात वीज वापराची नोंद होऊ नये अशी व्यवस्था केल्याचे आढळले. यानंतर आरोपीला दंडात्मक रक्कम आकारण्यात आली होती. (मंदिरातील दानपेटी फोडली, तिघांवर गुन्हा दाखल)

Gadcandur Electricity Theft Case : महावितरणची धडक कारवाई

घरगुती वीज मीटरमध्ये बेकायदेशीरपणे छेडछाड करून महावितरणची फसवणूक करणाऱ्या गडचांदूर येथील एका वीज ग्राहकावर गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वीही वीज चोरी केली असून, पुन्हा दुसऱ्यांदा हाच प्रकार केल्याचे तपासणीदरम्यान उघडकीस आल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास महावितरण गडचांदूरचे सहाय्यक अभियंता नितीन बापुराव नन्नावरे (वय ३३) आणि त्यांचे सहकाऱ्या सहाय्यक अभियंता रितेश ढवळे हे गडचांदूर परिसरात दैनंदिन तपासणी व कामकाजावर होते. यादरम्यान त्यांनी वार्ड क्रमांक ५, गडचांदूर येथील रहिवासी गंगय्या नरसय्या महाकालवार यांच्या घरगुती वीज मीटरची पाहणी केली. या पाहणीत आरोपी गंगय्या महाकालवार यांनी आपल्या घरगुती वीज मीटरमध्ये बेकायदेशीरपणे छेडछाड केल्याचे आणि विजेचा वापर मीटरमध्ये नोंदवला जाऊ नये, अशी विशेष व्यवस्था करून वीज चोरी केल्याचे उघड झाले.

या प्रकारानंतर महावितरणने नियमानुसार कारवाई करत आरोपीला ७६,६९० रुपयांची दंडात्मक रक्कम आकारली, जी आरोपीने भरली असून त्याची पावतीही त्याला देण्यात आली. मात्र, तपासात आरोपीचा जुना इतिहास समोर आला. यापूर्वी २२ फेब्रुवारी २०१८ रोजी देखील आरोपी गंगय्या महाकालवार याने अशाच प्रकारे वीज चोरी केली होती. त्यावेळी त्याने ५१,६७० रुपये दंडाची रक्कम आणि ६,००० रुपये तडजोड रक्कम असा एकूण ५७,६७० रुपयांचा भरणा करून प्रकरण मिटवले होते.

महावितरणच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती पहिल्यांदा वीज चोरी करताना आढळल्यास तडजोड रक्कमेचा पर्याय उपलब्ध असतो, परंतु दुसऱ्यांदा वीज चोरी केल्यास अधिनियमानुसार तडजोडीची रक्कम स्वीकारता येत नाही. आरोपीने वारंवार नियमांचे उल्लंघन करून पुन्हा वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आणि वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक संपूर्ण कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक अभियंता नितीन नन्नावरे यांनी २१ जुलै २०२६ रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून फिर्याद नोंदवली.

महावितरणच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी आरोपी गंगय्या नरसय्या महाकालवार याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक शिवाजी भीमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ वसंत शेडमाके या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment