चंद्रपूर – Gambling Raid Chandrapur: चंद्रपूर शहर पोलिसांनी राजकला टॉकीजजवळील झेंडी मुंडी (तितली भवरा) जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकास अटक केली आहे. ही कारवाई १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता झाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, इमाम नुरद्दिन तिघाले (वय ३५) याच्याकडून १,०५० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल आहे. (चंद्रपुरात झेंडी मुंडीचा खुलेआम जुगार, वाचा बातमी)
Gambling Raid Chandrapur: राजकला टॉकीजजवळ नेमके काय घडले?
चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या अलिखित अवैध धंद्याची News३४ ने बातमी प्रकाशित केल्यावर त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने दखल घेत झेंडी मुंडी जुगारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार चंद्रपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली, अन्यथा हा जुगाराचा खेळ असाच अविरत सुरू असता.
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकला टॉकीज जवळ सुरू असलेल्या झेंडी मुंडी (तितली भवरा) जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एकास रंगेहात अटक केली आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल, Gambling Raid Chandrapur
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे आणि त्यांचे पथक १३ नोव्हेंबर रोजी राजकला टॉकीजसमोरील इमाम पान सेंटरच्या बाजूच्या रूममध्ये इमाम नुरद्दिन तिघाले हा इसम लोकांकडून पैसे घेऊन ‘तितली भवरा’ म्हणजेच झेंडी मुंडी जुगाराचा खेळ खेळवत होता त्यानुसार पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन आणि पंचांना सोबत घेऊन तात्काळ राजकला टॉकीज परिसरातील त्या इमाम पान सेंटरला लागून असलेल्या रूमवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तिथे जुगार खेळणारे इतर लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र मुख्य चालकास पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले.
जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल, Gambling Raid Chandrapur
पोलिसांच्या चौकशीत पकडलेल्या आरोपीने आपले नाव इमाम नुरद्दिन तिघाले (वय ३५ वर्षे, रा. बिनबा वार्ड, चंद्रपूर) असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी १० वेगवेगळी चित्रे असलेली प्लास्टिकची पत्री, कागदावर चिटकवलेल्या व फाडलेल्या चिठ्ठ्या, ७ नग लोखंडी रिंग आणि जुगारासाठी लोकांकडून गोळा केलेले १०५० रुपये नगदी जप्त केले. यामध्ये १०० रुपयांच्या ९ नोटा आणि ५० रुपयांच्या ३ नोटांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी इमाम नुरद्दिन तिघाले याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपती तुकाराम वाढई हे करत आहेत. शहरात उघडपणे सुरू असलेल्या अशा अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







