Wardha Gadchiroli Chandrapur MLC Election उमेदवारी अर्ज दाखल

Chandrapur MLC Election । विधानपरिषद निवडणूक ३ उमेदवारांचे अर्ज दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 1, 2026

Chandrapur MLC Election : चंद्रपूर – महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण लखाणी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यासह अपक्ष उमेदवार म्हणून सुधीरचंद कोठारी यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (चंद्रपुरात महाविकास युवक आघाडीचा मनपावर मोर्चा)

९७७ मतदारांच्या चंद्रपूर-वर्धा व गडचिरोली जिल्ह्यासाठी नगरसेवकांना आपला आमदार निवडायचा आहे, मात्र निवडणूक सुरु होण्यापूर्वी घोडेबाजाराला सुरुवात झाली होती, कांग्रेसचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून अरुण लखाणी यांना हि निवडणूक सोपी जाणार असे चित्र आहे.

Wardha Gadchiroli Chandrapur MLC Election मध्ये कोण कोण मैदानात?

कांग्रेस पक्षाने मनपा निवडणुकीत स्वतःच्या नगरसेवकांची पळवापळवी केली होती, मात्र आता कांग्रेसचे नगरसेवक इतरांच्या संपर्कात आहे. त्यामुळे कांग्रेस पक्षाला हि निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. अरुण लखाणी यांनी आज वर्धा पालकमंत्री पंकज भोयर, चंद्रपूर पालकमंत्री अशोक वूईके, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार व आमदार देवराव भोंगळे, आमदार समीर कुणावार, आमदार मिलिंद नरोटे, आमदार श्रीकांत भारती, माजी खासदार अशोक नेते, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सुदर्शन निमकर, देवराव होळी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, महापौर संगीता खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.

कांग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष राजेंद्र वैद्य, कांग्रेस अध्यक्ष शिवा राव, विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.

वर्धा-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४० स्थानिक स्वराज्य संस्था असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार ४६९, गडचिरोली २४४ व वर्धा जिल्ह्यात २६४ असे एकूण ९७७ मतदारांचा समावेश आहे. मतदारांची जुळवाजुळव करताना उमेदवारांना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment