Gold Mangalsutra Fraud प्रकरणात बल्लारपूर चंद्रपूर येथे महिलेला मंगळसूत्र साफ करण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचे दृश्य.

gold mangalsutra fraud | मंगळसूत्र स्वच्छ करून देतो म्हणत अज्ञातांनी केला हातचलाखीचा प्रकार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 27, 2026

gold mangalsutra fraud : बल्लारपूर (चंद्रपूर) – सोन्याचे मंगळसूत्र साफ करण्यासाठी दिले आणि तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली, होय हि घटना बल्लारपुरातील टीचर कॉलोनी मडावी लेआऊट बामणी मध्ये घडली. या प्रकरणी १ लाख ५० हजारांची लूटच झाली. (राजुऱ्याचा बादशाह गुन्हे शाखेच्या जाळ्यात)

२६ मे रोजी सकाळच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील २ इसम हे टीचर कॉलोनी मध्ये पोहोचले त्याठिकाणी ३५ वर्षीय संगीता संतोष भुते यांच्या घरापुढे आले, आम्ही तांब्याच्या वस्तू लिक्विडद्वारे साफ करून देतो, तुमच्याजवळ तांब्याच्या वस्तू असेल तर द्या. संगीता भुते यांनी घरातील तांब्याचा गडवा त्यांना साफ करण्यासाठी दिला.

बल्लारपूरमध्ये gold mangalsutra fraud साफ करण्याच्या बहाण्याने कशी झाली फसवणूक

आपल्याजवळ चांदी किंवा सोन्याचे दागिने असतील तर ते सुद्धा आम्ही लिक्विडद्वारे साफ करून देऊ, असे म्हटल्यावर भुते यांनी देवघरातील चांदीची मूर्ती त्यांना साफ करण्यासाठी दिली, मूर्ती स्वच्छ झाल्यावर भुते यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र साफ करण्यासाठी त्या दोघांना दिले. 

त्यावेळी दोघे इसम म्हणाले कि तुमच्या घरातील एक लहान डबा द्या त्यामध्ये आम्ही लिक्विड मध्ये मंगळसूत्र टाकून देतो, १० मिनिटांनी तुम्ही डब्यातील मंगळसूत्र काढून घ्यावे, भुते यांनी घरातील डबा त्या इसमांना दिला, लिक्विड टाकत भुते यांनी मंगळसूत्र टाकलं, १० मिनिटे झाल्यावर तुम्ही डबा उघडून मंगळसूत्र बाहेर काढा असे म्हणत ते दोघे इसम निघून गेले. gold mangalsutra fraud

१० मिनिटांनी भुते यांनी डब्याचं झाकण उघडलं असता त्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं, दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी दोघांचा शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाही. संगीता भुते यांनी दोन अज्ञात इसमांनी १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचं मंगळसूत्र साफ करतो म्हणून फसवणूक केली, अशी तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिली. 

बल्लारपूर पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात इसमाविरुद्ध बीएनएस कलम ३ (५), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment