robbery case arrest प्रकरणात चंद्रपूरच्या गोंडपिपरी पोलिसांनी राजुरातील आरोपीला अटक करून चोरीतील मोबाईल व दुचाकी जप्त केली.

robbery case arrest । मोबाईल चोरीप्रकरणात राजुराचा बादशहा पोलिसांच्या ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 26, 2026

robbery case arrest : चंद्रपूर – २६ मे रोजी गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व गोंडपिपरी पोलिसांनी संयुक्तपणे केला असता राजुरा शहराचा गुन्हेगारी क्षेत्रातील बादशहा ला अटक करीत एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (किरकोळ वादात कुऱ्हाडीने हल्ला)

२६ मे ला गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वढोली गावात २ मोबाईल अज्ञाताने चोरी केले होते, सदर तपास एलसीबी व गोंडपिपरी पोलिसांनी संयुक्तपणे करीत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करीत राजुरा शहरातील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे ला सापळा रचत अटक करण्यात आली.

robbery case arrest पोलिसांनी कसा लावला छडा?

आरोपीने सदर जबरी चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला, पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेले २ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  robbery case arrest

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि रमेश हत्तीगोटे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मंगेश कराडे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलवार, विलास कोवे, प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, सुशील गोंगले, आकाश गुंजकर सह सायबर पोलिसांनी केली.         

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment