चंद्रपूर: राजुरा कॉपर केबल चोरी प्रकरणाचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छडा लावला आहे. राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ नोव्हेंबर २०२६ रोजी या चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. सुमारे १५ हजार रुपये किमतीचे कॉपर केबल वायर जप्त करण्यात आले. आरोपींना राजुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राजुरा कॉपर केबल चोरी: LCB ने कसा लावला छडा?
राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॉपर केबल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने समांतर तपास करत अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींना अटक केली असून, या रॅकेटमधील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी राजुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (एलसीबी ची गोवंश तस्करांवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त, वाचा बातमी)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) अन्वये अपराध क्रमांक ८२६/२६ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या राजुरा उपविभाग पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सूत्रे हलवत चोरीचा उलगडा केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
तिघांना अटक, तिघे फरार: आरोपींचा तपशील, राजुरा कॉपर केबल चोरी
या प्रकरणी पोलिसांनी अमन हरिश्चंद्र केसकर (वय १९ वर्षे, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर), अतिश बालाजी पवनकर (वय २१ वर्षे, रा. सास्ती, ता. राजुरा) आणि भंगार खरेदी करणारा इलियास अहमद खान (वय ३७ वर्षे, रा. गणपती वॉर्ड, बल्लारशाह) या तिघांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी अंकित दुम्पाला (रा. सास्ती, ता. राजुरा), राहुल निषाद (रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर) आणि अंकित सिंग (रा. सास्ती) हे तिघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (राजुरा कॉपर केबल चोरी)
कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात चोरीस गेलेले सुमारे १५ हजार रुपये किमतीचे कॉपर केबल वायर हस्तगत केले आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी राजुरा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे चोरीचे हे प्रकरण उघडकीस आले असून फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चोरीचे केबल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह तिघांना अटक, चंद्रपूर LCB ची कारवाई”