Chandrapur Copper Cable Theft प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी जप्त केलेला कॉपर वायर आणि ट्रक

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; दुर्गापूर पोलिसांकडून १० जण ताब्यात, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 19, 2026

चंद्रपूर: Chandrapur Copper Cable Theft : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातील कॉपर केबल चोरीच्या टोळीचा दुर्गापूर पोलिसांनी छडा लावला आहे. १८ सप्टेंबर रोजी पहाटे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी १० संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर आणि एक ट्रक असा एकूण २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

केंद्र परिसरात गेल्या काही दिवसांत केबल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने ही कारवाई केली. या टोळीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (हे हि वाचा – सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल)

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातून मौल्यवान कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा दुर्गापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत तब्बल २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी १० आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे औष्णिक विद्युत केंद्रासह औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Chandrapur Copper Cable Theft : १८ सप्टेंबरच्या पहाटेची कारवाई

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातून गेल्या काही दिवसांत कॉपर केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी दुर्गापूर पोलिसांचे विशेष पथक कार्यरत होते. दरम्यान, पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता, त्या माहितीच्या आधारे दिनांक १८ सप्टेंबर रोजी पहाटे पोलिसांनी सापळा रचून धडक कारवाई केली.

सहा क्विंटल कॉपर वायर आणि ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर, ज्याची अंदाजे किंमत ७ लाख २० हजार रुपये आहे, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला १५ लाख रुपये किमतीचा एक ट्रक असा एकूण २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून १० संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या प्रकरणी ऊर्जानगर वसाहत येथील रहिवासी फिर्यादी सहदेव कैलास नारनवरे (वय ४० वर्षे) यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३९८/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेंगावकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस हवालदार राजू गोखरे, पोलीस अंमलदार संदीप जाधव, सोनल खोब्रागडे, स्विखील उराडे आणि कोमल मोहजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत ही कामगिरी फत्ते केली. या टोळीकडून आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment