चंद्रपूर : Jayanti 2 Chandrapur : ‘जयंती-२‘ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून सामाजिक जाणिवेचा संदेश देणारा आहे, असे कलावंतांनी चंद्रपुरात सांगितले. शुक्रवारी आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात शुभम, प्रसन्नजीत आणि अविनाश लेनगुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा चित्रपट कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (हे हि वाचा – ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल)
सध्या हा चित्रपट चंद्रपुरातील चार चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर तो प्रकाश टाकतो, असेही कलावंतांनी नमूद केले. तरुणांमध्ये संवेदनशीलता वाढवणे आणि सकारात्मक संवाद घडवणे हा या भेटीमागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचा संबंध चंद्रपूरच्या भूमीशी जोडलेला आहे.
Jayanti 2 Chandrapur : ‘मीट द प्रेस’मध्ये कलावंतांची भूमिका
‘जयंती-२’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नसून, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाचा सशक्त संदेश देणारा कलाविष्कार आहे. हा चित्रपट कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला लावणारा आहे, असा सूर चित्रपटाच्या कलावंतांनी येथे आळवला. शुक्रवारी चंद्रपुरात आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रपटामागची भूमिका स्पष्ट केली.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘जयंती-२’ हा चित्रपट चंद्रपुरातील चार चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. या निमित्ताने चंद्रपूरला विशेष भेट देणारे चित्रपटातील कलाकार शुभम, प्रसन्नजीत आणि अविनाश लेनगुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर हा चित्रपट थेट प्रकाशझोत टाकतो. तरुणांमध्ये आणि समाजात सामाजिक विषयांबाबत संवेदनशीलता वाढवणे तसेच सकारात्मक संवाद निर्माण करणे हाच या भेटीमागचा मुख्य हेतू आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटाचा संबंध चंद्रपूरच्या इतिहास व भूमीशी जोडलेला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन स्थानिक कलावंतांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या जनजागृती उपक्रमासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंद्रपुरातील सहकारी अविनाश लेनगुरे, सम्राट कांबळे, अमित, केशव मेश्राम आणि इतर साथीदार सहभागी झाले आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने, विशेषत: युवापिढीने व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहावा आणि यातून मांडलेल्या विचारांवर मोकळा संवाद घडवून आणावा, असे आवाहन जयंती-२ च्या संपूर्ण टीमने याप्रसंगी केले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






